
Recent Posts
- My Shoe RackOctober 5, 2024
- My Study CornerJuly 11, 2024
- माझी पनामा कॅनॉलची सफरAugust 17, 2020
- My Shoe Rack
Categories
- Blogs (4)
फार वर्षे पनामा कॅनॉल बघण्याची इच्छा होती पण योग जुळून येत नव्हता. शेवटी जानेवारीमध्ये (करोना पर्व चालू होण्याच्या थोडे आधी) हा योग आला. मी पनामा शहरात अवघ्या दोन दिवसांसाठी पोहोचले. माझ्याकडे फक्त आजची संध्याकाळ व दोन दिवस होते. संध्याकाळी हाँटेलवर पोहोचल्यावर, बॅगा रूममध्ये टाकून, भटकायला बाहेर पडले. शहरात भटकताना आपल्या गोव्याचा थोडाथोडा भास होत होता. सगळीकडे नारळाची झाङ व लाल माती दिसत होती. बाकी समुद्राची निळाई पटकन नजरेत येत होतीच. पहिल्या दिवशी ‘बसने’ संपूर्ण शहर बघायला जायचा बेत होता, त्या प्रमाणे बाहेर पडले. बायोडायव्हर्सिटी म्युझियम, अमेरीका ब्रिज, आर्टस् म्युझियम, पनामा कॅनॉल (बाहेरून), कॅनॉलचे म्युझियम व त्यावर एक माहितीपट असा संपूर्ण दिवस भटकंतीत घालवला. पण असा कॅनॉल बाहेरून बघून माझे पोट भरणार नव्हते. इथे येण्याचा ज्याच्यासाठी खटाटोप केला तो ‘कॅनॉल’(त्यात उतरून) बघायला उद्या जायचे होते, त्यामुळे माझी उत्सुकतापण शिगेला पोहोचली होती. उद्या पहाटे पाच वाजता आम्हीं निघणार होतो.
जगात मनुष्य निर्मित जितकी आश्चर्य आहेत त्यापैकीच हे एक आहे. पनामा कॅनॉलबद्दल ह्या आधी बरेच काही ऐकले होते, ते म्हणजे – पँसिफीक व अटलांटिक ह्या दोन समुद्रांना जोडणारा कालवा आहे, पण ह्या दोन समुद्रांच्या भरतीच्या लाटांची उंची कमीजास्त आहे, हा कालवा बांधताना खूप माणसे काम करत होती, त्यात मनुष्य हानी हि खूप झाली इत्यादी. आज मी तेथे येऊन पोहोचले होते व उद्या बघायलाही जाणार होते.
१८८0 मध्ये कालव्याचे काम सुरू करायचे ठरले. ज्याने सुएझ कालवा बांधला त्याच इंजिनीअरला- सर फर्डिनांड लेसेप्सला बोलवण्यात आले. जगभरातून मजूर कामाला आले. वेगवेगळ्या भाषा ,जाती व धर्माची अनेक लोक एकत्र येउन काम करू लागली. परंतु काम फ़ार अवघड होते, त्यातच मलेरिया व पिवळा ज्वर ह्यामुळे जवळजवळ २०,००० लोक मरण पावले. कंपनीचे पैसेही संपले व १८८९ मध्ये काम बंद पडले. १९०३ मध्ये अमेरिका पुढे सरसावली. त्यांनी पनामा बरोबर करार केला,तसेच मलेरीया व पिवळा ज्वरावर औषध शोधून, त्याचे उच्चाटन केले आणि १९०७ मध्ये काम हातात घेउन १९१४ला पूर्ण केले. पुढे कित्येक वर्षे अमेरिका कॅनॉलची देखभाल व अर्थार्जन करत होती. शेवटी कराराप्रमाणे १९९९ साली तो पनामा देशाकडे सूर्पूद केला.
वर सांगितल्याप्रमाणे दोन महासागरांनां जोडणारा, ८०कि.मी चा हा कॅनॉल आहे. पॅसिफिक समुद्रातून आत शिरताना बोटी ३ वेगवेगळ्या कप्प्यां (लॅाक्स) मधून २७ मीटर उंच असलेल्या ‘गातून तलावात’ जातात व तश्याच कप्प्यांमधून खाली उतरून अटलांटीक समुद्रात शिरतात. त्याच पध्दतीने अटलांटीक मधून पॅसिफिक मध्यें येतात. त्यामुळे दक्षिण अमेरिकेला वळसा घालून येणे वाचते. प्रत्येक लॉकमध्ये बोट आल्यावर त्यातील पाण्याची पातळी वाढवल्यामुळे बोटी हळूहळू वरच्या पातळीवर पोहोचतात. उतरताना पाण्याची पातळी कमी केली गेल्यानें बोटी सावकाश खालच्या पातळीवर येउन दुसऱ्या समुद्राला मिळतात. ही लॅाक्स अंदाजे ३०० मीटर लांब व ३५ मीटर रूंद आहेत. एकदा बोट लॉकमध्ये आली की गेट बंद होतात आणि मग पाण्याची पातळी वाढत जाते .पाणी कुठेही गळणार नाही (air tight compartment) ह्याची संपूर्ण काळजी घेतली जाते. त्यासाठी गेटची दारे, २५ मीटर उंच व ७ मीटर जाड अशी महाकाय आहेत व त्यातून तसूभरही पाणी आत किंवा बाहेर जाणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. कॅनॉलचा टोल प्रत्येक बोटी मागे ३ लाख ते ४ लाख डॅालर इतका आहे. दररोज कितीतरी बोटी मालाची ने-आण करत असतात. कॅनॉलच्या उत्पन्नामुळे पनामा देशाला पुरेपुर फायदा झाला आहे. आता बोटींचे आकार अजूनच वाढले आहेत व त्यामुळे पनामा सरकारने अजून मोठे लॉक्स बांधून, आपले उत्पन्नही वाढवले आहे. पर्यावरणाच्या विचाराने लॉक्समधील तेच पाणी आता परत परत वापरलेही जाते.
हे सर्व बघून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. जे बघण्यासाठी खूप खटाटोप केला ते शेवटी बघितले व त्या आनंदातच हॅाटेल वर परत येउन परतीच्या प्रवासाची तयारी चालू केली.
कॅनॉल सेक्शन
ज्योती पानसे.
९८६०० ९९७०१
कालव्यातून वहातूक करणाया प्रचंड मोठ्या बोटी
लॉक्सची महाकाय गेट्स
लॉक्समध्ये पाणी भरताना
JPA Architects
A-3, Reverie, Above Skoda Showroom,
Bhandarkar Institute Road, Pune- 411004,
Maharashtra, India.